Ad will apear here
Next
पंढरपुरात फुलला भक्तीचा मळा!


पंढरपूर :
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहाटे सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासह सुनील ओमासे आणि नंदा ओमासे या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. ‘राज्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला सुखी ठेव,’ असे साकडे चंद्रकांत पाटील यांनी विठूरायाला घातले. 



महापूजेनंतर संत तुकाराम भवनात झालेल्या कार्यक्रमात मानाचे वारकरी असलेल्या ओमासे दाम्पत्याचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे शेतकरी दाम्पत्य सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील बेडग या गावातील आहे. २००३पासून वारी करणारे ओमासे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. प्रथेप्रमाणे त्यांना एसटीचा मोफत पासही देण्यात आला.



‘गेली तीन-चार वर्षे ‘निर्मल वारी’साठी प्रयत्न करण्यात आले. त्यांना चांगले यश लाभले. पुढील वर्षी वारी धूरमुक्त होण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यश्र गहिनीनाथमहाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, माजी अध्यक्ष अतुल भोसले यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी, मान्यवर आणि वारकरी उपस्थित होते. 















BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZXSCG
Similar Posts
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेलपानांची सजावट महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली होती. त्याचे हे फोटो...
माघी वारीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट पाच फेब्रुवारी २०२० रोजी जया एकादशी आहे. त्या निमित्ताने पंढरपुरात माघी यात्रा असते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने या यात्रेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व तसेच मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. त्याची ही छायाचित्रे
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला करोनामुक्त कर! सोलापूर : ‘महाराष्ट्रासह अवघ्या देशाला करोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे,’ असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज (एक जुलै) घातले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या
चैत्री वारीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुलाबपुष्पांची सजावट आज चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशी. या काळात दर वर्षी पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्री वारी सोहळा असतो. यंदा मात्र करोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू झालेल्या संचारबंदीमुळे हा सोहळा रद्द झाला आहे. अर्थात मंदिरातील नित्यपूजा आणि धार्मिक विधी प्रशासनाचे सर्व नियम पाळून होत आहेत. आज चैत्री

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language